19 December 2013

शंभराच्या नोटा तुम्ही मला आणा राया!

चिडचिड होतेय नुसती चिडचिड. वैताऽऽग!

कारण माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून माझा नवरा मला घरखर्चासाठी जे पैसे देतो, त्या चक्क हजाराच्या नोटा असतात! का, तर म्हणे मला ATM मधे जाण्याची तसदी पडू नये म्हणून. अरे पण राव, तुझ्या त्या हजाराच्या नोटा रोज-रोज कुठे चालवू मी? हजाराच्या नोटा देतो आणि माझ्याकडे काय पन्नास शंभरच्या नोटा असतील, त्या मागून घेतो. रोज टॅक्सीला द्यायला लागतात म्हणे! आणि मला नाही का लागत? कैच्याकै! आता या हजाराच्या नोटा जर सुट्ट्या करून मिळत नसतील तर मला बॅंकेत हे पैसे भरून मग ATM मधून थोडे थोडे पैसे काढणं क्रमप्राप्त आहे ना? हा द्राविडी प्राणायाम झाला की नाही? पण नाही, माझ्या सरळसोट आयुष्यात थोडी हलचल पैदा केल्याशिवाय नवरोबाला चैनच पडत नाही.

15 December 2013

१६ डिसेंबर, एक अविस्मरणीय दिवस!

सहसाच असा एखादा भारतीय सापडेल, ज्याला या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व ठाऊक नसेल. १६ डिसेंबर १९७१ या दिवशी पाकिस्तानने भारतापुढे शरणागती पत्करली. स्वतंत्र बांगला देशची निर्मिती झाली आणि तो दिवस आपण आज विजय दिन म्हणून साजरा करतो.


गेल्या वर्षी शिवाजी पार्कवर भारतीय सेनेतर्फे आयोजित केला गेलेला विजय दिन सोहळा पाहाण्यासाठी मी देखील गेले होते. आपल्या सेनेचं कर्तृत्व पाहून खूप खूप अभिमान वाटला. गर्वाने मान आणखी ताठ झाली. असं वाटू लागलं की सगळ्या जगाला सांगावं, "कुणाची हिम्मत आहे मझ्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहाण्याची? पाहाताय ना आमचं सैन्य?"

10 November 2013

संस्कृत आणि आपण

मी सातवीत असताना मला कळलं की पुढच्या वर्षीपासून म्हणजे आठवीपासून मला सेमी इंग्लिश अभ्यासक्रम असणार आहे. आमच्या शाळेत फक्त ’अ’ आणि ’ब’ तुकडीलाच सेमी इंग्लिशची सुविधा देण्यात आली होती. सेमी इंग्लिश म्हणजे गणित व विज्ञान हे विषय पूर्ण इंग्रजीतून, तर इतर विषय नेहमीप्रमाणेच मराठीतून शिकवले जाणार होते. पण माझ्या आजारपणामुळे माझे बरेच खाडे झाले होते. त्यामुळे पुढच्या वर्षी इंग्रजी माध्यमातून शिकवलेलं जर मला समजलं नाही तर मी नापास व्हायला नको म्हणून माझ्या आईने सरळ माझी ’अ’ तुकडी बदलून मला ’क’ तुकडीमधे प्रवेश घेऊन दिला. जेणेकरून आजारपणामुळे जरी शाळा बुडली तरी मराठीतून सर्व विषय समजून घेतल्याने परिक्षेत नापास होण्याची वेळ येणार नाही.

06 November 2013

Krrish 3 Review

वर्तमानपत्रात आलेली चित्रपटाची समीक्षा वाचून चित्रपटाचा दर्जा ठरवू नये, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बहुतांश वर्तमानपत्रांनी क्रिश ३ च्या दर्जाबद्दल शंका व्यक्त करून हा चित्रपट एखाद्या केबल वाहिनीवर दाखवला जाईपर्यंत प्रेक्षक वाट पाहातील याची व्यवस्था करून ठेवली आहे. तथापि अशा रिव्ह्यू वर विश्वास न ठेवता हा सिनेमा काल चित्रपटगृहात पाहिल्यानंतर अनेक दिवसांनंतर एक चांगला हिंदी चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळालं आणि चांगला चित्रपट म्हणजे मसाला सिनेमा. डोक्याला रोजच्या रोज ताप घेऊन जगणार्‍या सामान्य माणसांना त्यातून सुटका मिळावी म्हणून निराळ्या दुनियेत घेऊन जाणारा एक विरंगुळा हवा असतो, तो या सिनेमाच्या निमित्ताने जरूर मिळेल. हाय व्हॅल्यूज आणि स्वत:चं स्टॅण्डर्ड बिन्डर्ड मेन्टेन करणार्‍यांना या चित्रपटातून काही मिळणार नाही. VFX च्या उच्च पातळीवर बनवलेला हा सिनेमा चित्रपटगृहातच पाहाण्यासारखा आहे.

03 November 2013

Krrish 3

क्रिश ची पटकथा खास नाही, दिग्दर्शन खास नाही, नृत्य खास नाही... Who cares?

रा वन, एजंट विनोद, एक था टायगर या सिनेमांना आम्ही एक संधी दिलीच ना? तिथे पटकथा, नृत्य, दिग्दर्शन आणि तंत्रज्ञान या सर्वच बाबतींमधे प्रचंड अपेक्षाभंगाशिवाय इतर काहीच पदरी पडलं नाही. पटकथेची चोरी कुठल्या सिनेमात होत नाही? चोरी चोरी सिनेमापासून इंग्रजी सिनेमे हिंदीत आल्याचंच ऐकतोय. चोर्‍या कदाचित त्याही आधीपासून होतच होत्या. मग क्रिशच्या वेळेसच का बोंबाबोंब? बहोत हो गयी खान कंपनी. अब हृतिक की बारी है।

02 November 2013

The challenge of every day

Two days ago I saw a short film "That Day After Everyday" on YouTube. The film throws light on extremely sensitive issues like eve teasing and molestation.

Around the globe, every single woman has suffered eve teasing or molestation once in her lifetime. Even the society around her advises her how not to get raped than educating the culprit about "'how to respect a woman'.

30 October 2013

कोण होत्या त्या?

आज अचानक ही घटना आठवली. ही देखील सत्यकथाच आहे. जवळ जवळ २० वर्षांपूर्वीची, तेव्हा मी मार्शल आर्ट शिकत होते. आमचा खूप छान ग्रुप होता. शनिवारी, रविवारी सर्वांना सुटी असली की आम्ही एकत्र जमत असू, ठाण्यातल्या रस्त्यांवर भटकत असू. एकदा आम्ही ठरवलं पावसाळ्यात माथेरानची सहल करायची. एक रविवार निश्चित केला आणि निघालो माथेरानला. तेव्हा एखादी गाडी बुक करावी आणि जावं असं काही डोक्यात नव्हतं. ठाण्याहून ट्रेनने कर्जत आणि पुढे प्रायव्हेट टॅक्सी करून माथेरान! तेव्हा माथेरानची ती झुकझुक गाडी नेमकी बंद होती, नाहीतर आणखीन मज्जा आली असती. पण घरून जेवणाचे डबे घेऊनच निघालो होतो. पावसाळ्याचे दिवस! अचानक दुकानं बंद बिंद झाली तर उपाशीपोटी राहायला नको म्हणून प्रत्येकाच्याच आईने काही ना काही डब्यात भरून दिलेलं.

02 October 2013

Planchet

Hi friends,

Today I want to share a real incident happened with me; the incident which inspired me to write a fiction Planchet.

It happened around 12 years ago. One evening when I returned home from office, I saw the door locked and my mother was gone to my aunt's house which is 2 blocks away from my home. I assumed that mother will return within an hour, so I prepared my tea and called on aunt's phone to tell my mother that I am home. My mother was said excitedly, "Just finish your tea and come here. These folks are doing a Planchet!"

Planchet...?!

19 September 2013

सत्पात्री दान

मला वस्तूंच्या पुनर्वापर, पुनर्निर्मिती या गोष्टी प्रचंड आवडतात. केवळ खर्चाच्या दृष्टीने नाही, तर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने देखील! कपड्यांसारख्या गोष्टी जर मी पुनर्वापरासाठी वापरल्या तर मला असं सुचवलं जातं की "यापेक्षा एखाद्या गरजू व्यक्तीला हे शर्ट किंवा हा ड्रेस दिला असतास, तर जास्त चांगलं झालं असतं."

निश्चितपणे! मला गरजू व्यक्तींना मदत करायला आवडतं. पण मी जे कपडे पुनर्वापरात आणते, ते अशा ठिकाणी फाटलेले, खराब झालेले असतात की शिवून, धुवून वगैरे अंगातला कपडा म्हणून घालण्याच्या योग्यतेचे राहिलेले नसतात. मुळात एखादी व्यक्ती गरजू आहे म्हणून त्या व्यक्तीला आपली वापरलेली वस्तू देणं हे मला व्यक्तीश: चूक वाटतं.
Advertisement


Books I read

Amerikechi C.I.A.
पर्व [Parva]
LOPAMUDRA
Asurved
Sathe Faycus
Nazi Bhasmasuracha Udyast
Mahanayak - A fictionalized biography of Netaji Subhas Chandra Bose
Hullabaloo in the Guava Orchard
The Magic Drum And Other Favourite Stories
Yash Tumachya Hatat
Baba Batesharnath
Panipat
Swami
Shriman Yogi
Mandir Shilpe
Mantra Shrimanticha
Avaghe Dharu Supanth
Women & The Weight Loss Tamasha
Majhi Janmathep
Amrutvel


Kanchan Karai's favorite books »