Krrish 3

क्रिश ची पटकथा खास नाही, दिग्दर्शन खास नाही, नृत्य खास नाही... Who cares?

रा वन, एजंट विनोद, एक था टायगर या सिनेमांना आम्ही एक संधी दिलीच ना? तिथे पटकथा, नृत्य, दिग्दर्शन आणि तंत्रज्ञान या सर्वच बाबतींमधे प्रचंड अपेक्षाभंगाशिवाय इतर काहीच पदरी पडलं नाही. पटकथेची चोरी कुठल्या सिनेमात होत नाही? चोरी चोरी सिनेमापासून इंग्रजी सिनेमे हिंदीत आल्याचंच ऐकतोय. चोर्‍या कदाचित त्याही आधीपासून होतच होत्या. मग क्रिशच्या वेळेसच का बोंबाबोंब? बहोत हो गयी खान कंपनी. अब हृतिक की बारी है।


हृतिक किमान त्याच्या प्रत्येक सिनेमात त्या व्यक्तिरेखेशी समरसून काम करतो. त्याचा प्रत्येक संवाद न्‌ संवाद, त्याने जीव ओतून म्हटलेला असतो, शर्ट पॅन्टच्या खिशात हात घालून त्याला नृत्य करावं लागत नाही, बायकी आवाजात रेकून संवादफेक करावी लागत नाही आणि मर्दानी देखणेपणात हृतिकचा हात धरू शकेल असा दुसरा हिरो हिंदी चित्रपटसृष्टीत नाही. हृतिक असलेली चित्रपटाची फ्रेम अन्‌ फ्रेम सुंदर असते. आम्ही थिएटरमधे जातो ते हृतिकला पाहाण्यासाठी. चित्रपट चांगला असो वा नसो, क्रिश थिएटरमधेच पाहाणार.

Comments

Post a Comment