धुळवडीच्या शुभेच्छा!

"सर्वसाधारणपणे रंगपंचमी, धुळवडीची गाणी म्हणजे कशी? हिरो धटिंगणासारखा हिरविणीच्या मागे रंगाने भरलेले हात घेऊन फिरतो असतो आणि ती लांब पळत असते, जोडीला त्या हिरोचं टोळकं हिरविणीच्या सख्यांच्या मागे धावतं, अशी असतात. इथे थोडा निराळा प्रकार आहे. इथे नायिकाच शोधतेय आपल्या पसंतीचा कुणी आहे का?


मोहल्ल्यात तरी तिला तसा कुणी भेटलेला नाही. आपल्या अवस्थेचं वर्णन ती इतकं
बिनधास्तपणे करतेय कि तिची आधुनिक असलेली मैत्रीण सुद्धा चकित झाली आहे.

जली तो बझे ना, कसम से कोयला हो गयी,
लगी है, बुझे ना, कसम से तौबा हो गयी
मिला ना कोई ऐसा, मेरे सपनों के जैसा
छान के मुहल्ला सारा, देख लिया

भारी रंगीत आणि फटाक्‌ गाणं आहे. ह्यात क्लासिक बिसिक शोधू नका. ऐकायचं, बघायचं, मज्जा वाटून घ्यायची.

सर्वांना धुळवडीच्या शुभेच्छा!

रंगलेल्या चेहेऱ्यांचे फोटो टाका रे सर्वांनी.

No comments:

Post a Comment