Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

ताप झाला

0 comments
उन्हाळ्यात ताप येणं हा एक खौफनाक, दर्दनाक अनुभव असतो. नुकतीच या अनुभवातून शब्दश: तावून सुलाखून बाहेर पडलेय.

कशात काही नाही न्‌ उगाच ताप आला. आला तर आला पण पूरे पाच दिवस मुक्काम ठोकून बसला. त्यादिवशी संध्याकाळी सैराट पाहून आले आणि अर्ध्या तासात तापाने फणफणले. Viral fever माहित होता पण तो असा चित्रपटगृहातून व्हायरल होईल हे अपेक्षित नव्हतं.

आधीच उन्हाळा त्यात ताप. पंखा बंद केला तर उकडतंय आणि सुरू ठेवला तर थंडी वाजतेय असं विचित्र वातावरण तयार झालं होतं. OTC आणि डॉक्टरांनी दिलेली अशी सगळी औषधं घेऊन झाली होती पण तापमहाशय काही जायचं नाव घेत नव्हते. औषधांमुळे तात्पुरता ताप गेला कि आलेल्या घामामुळे आणखी त्रासिक वाटू लागायचं. तापामधल्या ग्लानीत कुणाशी काय बोललेय, काय खाल्लंय हेही आठवत नाहीये. असं वाटत होतं कि हा ताप काही सहजासहजी माझी पाठ सोडणार नाही.

पण आज सकाळी पाहते तर साहेब गाशा-गोशा गुंडाळून धूम पळालेले आहेत. ते पाच दिवस जणू काही एखादं दु:स्वप्न असल्यासारखे उडून गेलेले आहेत. अंगात सळसळता वगैरे उत्साह असतो तसं काहीसं वाटू लागलं आहे. एकदम मस्त! आता पुन्हा कामाला सुरूवात करणार, नव्या उत्साहाने.


No comments:

Post a comment