Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

सैराट झालं जी!

0 comments
काल सैराट पाहून आले. सुंदर चित्रपट आहे. नागराज मंजुळेंनी पुन्हा एकदा एक अप्रतिम कलाकृती सादर केली आहे. आकाश ठोसरचा अभिनय छान. रिंकू राजगुरूच्या अभिनयाचा तर प्रश्नच नाही. पोरीने एवढा जाणता केला आहे कि ती अजून नववीत शिकतेय ह्यावर विश्वास बसत नाही. "परश्या"चे मित्र बनलेल्या कलाकारांचा, खासकरून "प्रदीप"चा अभिनय आवडला.
marathi, movie, download, sairat, song, dowload, free, सैराट, मराठी, सिनेमा, चित्रपट, डाऊनलोड, गाणी, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, नागराज मंजुळे, nagraj manjule, akash thosar, rinku rajguru,

खरा चित्रपट मध्यंतरानंतर सुरू होतो असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध ह्यात प्रचंड अंतर आहे. चित्रपटाची गती मध्यंतरानंतर थोऽडी मंदावते, स्वप्न आणि सत्य ह्यात किती तफावत असते ह्यावर प्रेक्षकांना विचार करायला वेळ मिळतो. आता पुढे काय, अशी उत्सुकता असतानाच अचानक चित्रपट शेवटच्या टप्प्यावर पोहोचतो.

चित्रपटाचा शेवट हा प्रत्येक प्रेमकहाणीचा अंत नसतो पण जिथे जाती-धर्माचा प्रश्नच येत नाही अशाही काही प्रेमकथांचा अंत हा चित्रपटातील शेवटासारखा असतो. लेखक सुहास शिरवरळकारांनी सुरवंट आणि फुलपाखराचं उदाहरण एका कादंबरीत दिलं होतं. मी त्याच शैलीत म्हणेन - सुरवंट हा प्रत्येक फुलपाखराचा भूतकाळ असतो पण फुलपाखरू हे सुरवंटाचं चिरंतन सत्य आहे. ते आपण स्विकारलं नाही तरी ते सत्यच असतं. स्वत:ला फुलपाखरू बनवण्यासाठी सुरवंटाने काही काळ कोशात काढला हे अमान्य करून फुलपाखराचा सुरवंट म्हणून द्वेष करणं हा आपल्याच विचारांचा कोतेपणा असतो.

No comments:

Post a comment