10 July 2016

नमस्कार अनामित वाचकांनो,

मी नियमीत ब्लॉगिंग सुरू करून काही दिवसच झाले असतील, मला WhatsApp वर संदेश येऊ लागले आहेत. मला नियमीत संदेश पाठवणाऱ्या सर्वांना नम्र विनंती आहे कि कृपा करून आपलं नाव आणि कुठला लेख वाचला हे आधी सांगत जा.

आपलं लेखन इतरांना आवडतंय हे जाणून घ्यायला कुणाला आवडत नाही? मी देखील त्याला अपवाद नाही पण आपल्याला WhatsApp वर संदेश कोण आणि कशाबद्दल पाठवत आहे, हे माहितच नसेल तर उत्तर देणं कठीण होऊन जातं. शिवाय संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीबद्द्ल, त्याच्या हेतूबद्दलही शंका निर्माण होते आणि मग ते नंबर्स ब्लॉक केले जातात.

अनेक अनामित संदेश रोज येत असतात. त्या प्रत्येक संदेशाची नोंद घेणं शक्य नसतं. वर सांगितलेला तपशील दिलात तर निवांत असताना मी उत्तर देऊ शकेन, आपलं नाव सेव्ह करून ठेवलं कि पुढच्या वेळेस गल्लत होणार नाही. संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीबद्दल मोजकीच माहिती असली तर संवाद साधणं सोपं होतं. प्रत्येक वेळेस संदेशाला उत्तर देणं शक्य होईलच असं नाही पण उत्तर नक्की देईन. मात्र आपलं नाव आणि कुठला लेख वाचला, हे आवर्जून सर्वात आधी कळवत जा.

धन्यवाद.

No comments:

Post a Comment