09 July 2016

सामाजिक भान

हा फोटो कुठे, कधी काढला गेला आहे हे मला माहित नाही पण फोटोत जे दिसतंय ते सद्यपरिस्थितीबद्दल भाष्य करण्यासाठी पुरेसं आहे, असं मला वाटतं.

सामाजिक भान, आपली जबाबदारी वगैरे समजून वृक्षारोपणाचे उपक्रम राबवले जातात, फोटो काढले जातात पण दुसऱ्या दिवशी त्या नवीन लावलेल्या रोपट्यांना पाणी देण्याचं किती जणांना लक्षात राहातं? वृक्षारोपण कार्यक्रमाचे फोटो सोशल नेटवर्किंग साईट्सवर प्रकाशित केल्यानंतर, त्या रोपट्याची वाढ योग्य रितीने होत असल्याचे फोटो मात्र पोस्ट होताना दिसत नाहीत. कि वृक्षारोपणासारखे उपक्रम ही देखील निव्वळ स्वत:ची प्रसिद्धी करण्याची बाब झाली आहे?


वरच्या फोटोमध्ये सामान्य ज्ञानाचा अभाव तर दिसतोच आहे पण त्या नवीनच लावलेल्या रोपट्याच्या भविष्याची चिंता करण्यासाठी पुरेसं वातावरण तयार झालेलं दिसतंय. रोपट्याला पुरेसं पाणी मिळेल इतका पाऊस वरून पडत असताना वर छत्री धरून, रोपट्याला पाणी घालताना काढलेला फोटो म्हणजे निव्वळ प्रसिद्धीच्या हव्यासाशिवाय दुसरं काय असू शकेल?

No comments:

Post a Comment