Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

Blog0107102016

0 comments
ह्या लोकसत्ता आणि म.टा.ला काय फवाद प्रेमाचा कीडा चावलाय का? एक त्याच्या दुसऱ्यांदा बाप होण्याची बातमी छापतंय, एक त्याच्या कुटुंबाची माहिती जाणून घ्या म्हणतंय. @#$%&!

हिंदी चित्रपटसृष्टीतले आणि काही फेकुलर्स अपवाद वगळता सगळी भारतीय जनता पाकिस्तानी कलाकार "नको" म्हणते आणि ह्या वृत्तपत्रांना काय फवादने बाळाच्या बारश्याच्या घुगर्‍या वाटल्या कि काय?

आपल्या देशाचे सैनिक आपल्यासाठी प्राण पणाला लावून लढतात त्याची किंमत उरली नाही का आता? तिकडे सर्जिकल अटॅक झाला तेव्हा भारतीयच काय पण पाकिस्तानी जनताही डाराडूर झोपलेली होती. झालाय का कुणाला त्रास?

$%@#& वर पुरावे कसले मागतात? ह्यांची हात जोडून परवानगी घ्यायला हवी होती का आधी? ज्यांनी लाल दिव्याच्या गाड्यांना नाकं मुरडली तेच आता लाल दिव्याच्या गाड्यांमधून मिरवतात आणि तोंड वर करून पुरावे सुद्धा मागतात.

कुणाला मल्लिनाथी करायची आहे कि पाकिस्तानी असले तर तेही कलाकाराच आहेत अशी? ते कलाकार आणि भारतीय जनता त्यांना डोक्यावर उचलते ते काय माकड म्हणून का? कलेची एवढी चाड पाकिस्तानला असती तर फक्त खानांचेच सिनेम बरे चालतात तिथे?

एक साधी गोष्ट आहे, समजा उद्या... देव न करो... पण पाकिस्तानच्या जागी आपण असतो आणि आपल्या जागी अमेरिका असती तर तिथे काम करणाऱ्या आपल्या कलाकारांना केलं असतं का माफ कुणी?

काय ती वृत्तपत्रांची देशभक्ती आणि काय ती देशभक्त वृत्तपत्रांची पत्रकारिता!

No comments:

Post a comment