माझा एक भाचा लहान असताना कुणाकडेही गेला कि त्या घरातल्या सदस्यांचे वाढदिवस कधी असतात ते विचारायचा. ती माहिती मिळाली कि अगदी निष्पाप चेहेऱ्याने विचारायचा, "मला बोलवाल का वाढदिवसाला?" 😊
हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सर्वांनाच अनपेक्षित असायचा पण लहान मुलं कधी काय विचारतील ह्याचा नेम नसतो. शिवाय इतक्या गोड मुलाला कुणी 'नाही' म्हणतं का? 'हो, तुलाही बोलवू वाढदिवसाला' असा तोंडभरून होकार मिळाला की स्वारी खुश! 🤗
बरेच महिने त्याने हा उपक्रम सुरू ठेवला होता. आधी त्याच्या आईलाही कळलं नव्हतं कि हा जिथे जातो तिथे हेच का विचारतो. नंतर एकदा तिला उलगडा झाला. 🤔
सर्वसाधारणपणे "बडडे"ला खाऊचा मेन्यू काय असतो? केक आणि वेफर्स. 🎂🍟
त्याची आई त्याला तेलकट वेफर्स खाऊ द्यायची नाही म्हणून त्याने असा मार्ग शोधून काढला होता.💡😅