06 November 2016

Primitive Technology

I don't know his real name but I call him John. He is a regular guy from Queensland, Australia who has developed a unique hobby which he enjoys on weekends.

John studies the lifestyle of primitive human through Internet articles and books. He then implements that information in creating primitive huts and tools from scratch. He even creates fire by rubbing sticks.

John has a video channel called Primitive Technology on YouTube where he occasionally posts videos of his creations. He never speaks during his video sessions. All you can hear is sound of nature but John also has a wordpress blog with the same name where he has documented his experiments in detail.

I must mention that John does not have a Facebook page. There are many duplicate pages and youtube channels publish his videos and his fans keep reporting it from time to time.

John is currently learning to make a shrimp trap but there are many vides where you can see John baking tiles for a roof or making earthen pots for cooking and other use. Those videos are entertaining and informative. That's the reason John has increasing number of fans every day.

हा एक माणुस आपल्याला फार आवडतो. त्याचं नाव...? त्याच्या ब्लॉगवर ’जॉन’ असं नाव लिहिलंय. ते त्याचं खरं नाव नसावंच पण आपण त्याला ’जॉन’च म्हणू. ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलॅंड राज्यात राहाणारा हा जॉन चारचौघांसारखंच खातो, पितो, नोकरी करतो पण त्याचा छंद आगळा-वेगळा आहे.

जॉन आदीम काळातील मानवाच्या जीवनशैलीचा पुस्तकं व इंटरनेटवरील लेख वाचून अभ्यास करतो आणि सुटीच्या दिवशी तशी जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व सामग्री त्याने त्या काळातील मानवाला उपलब्ध असलेल्या स्रोतांचा वापर करूनच तयार केली आहेत. मग ते एखादं हत्यार असो वा अन्न शिजवण्याचं भांडं असो किंवा राहाण्यासाठी तयार केलेली लहानशी झोपडी असो; जॉनने कुठेही आधुनिक उपकरणांचा वापर केलेला नाही. अगदी चुलीसाठी व शेकोटीसाठी लागणारा अग्निदेखील त्याने लाकडावर लाकूड घासून मिळवला आहे.

यूट्यूबवर प्रिमिटिव्ह टेक्नॉलजी ह्या नावाने जॉनने एक चॅनल सुरू केलंय. तिथे तो त्याच्या निर्मितीचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. आतापर्यंत जवळपास २२ व्हिडिओ तिथे पोस्ट झालेले आहेत पण एकाही व्हिडिओमध्ये जॉनचा आवाज ऐकता येत नाही. जो काही ध्वनी आहे तो तिथल्या नैसर्गिक वातावरणाचा.सध्या तो कोळंब्या पकडायला शिकतोय पण त्याचे या आधीचे व्हिडीओजसुद्धा मनोरंजक आहेत. त्याने घरासाठी चूल आणि कौलं तयार करतानाचे व्हिडीओज माझे सर्वात आवडते आहेत.

त्याच्या व्हिडीओजच्या अनेक ड्युप्लिकेट्स निघाल्या पण जॉनच्या चाहत्यांनी परस्पर त्या रिपोर्ट करून जॉनला अपलं सहकार्य दर्शवलं. जॉन फेसबुकवर नाही पण त्याच्या नावाने तिथेही बरीच ड्युप्लिकेट पेजेस निघाली आहेत. जॉनचा ब्लॉग वर्डप्रेस वर आहे. त्याचंही नाव Primitive Technology असंच आहे. तिथे मात्र त्याने त्याच्या कामाचा संगतवार तपशील दिला आहे.

तुम्हाला जर अशा व्हिडीओजची आवड असेल तर जॉनचं काम नक्की बघा.

ह्या जॉनला मी सर्वात आधी पाहिलं ते नितीन पाटकर यांच्या टाईमलाईनवर.

Thanks to Nitin Patkar for introducing such a wonderful and informative YouTube Channel.

No comments:

Post a Comment