16 December 2016

हम्मा हम्माचं रिमिक्स

श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर दोघेही ’क्यूट’ ह्या सदरात जमा होणारी मंडळी आहेत. त्यांचं ’हम्मा हम्मा’ गाण्यावरचं नृत्य पाहून ते इष्काच्या रंगमहालात प्रितीचा गुलाल उधळत आहेत असं अजिबात वाटत नाही.

फार फार तर कुत्र्याची दोन गोंडस पिल्लं एकमेकांशी कसं लुटूपुटूचं भांडतात, तशी वाटतात.

ते उदाहरण बरं वाटत नसेल तर ठिकरीचा खेळ खेळता, खेळता रस्त्यातून जाणाऱ्या गायीला पाहून बालकं ओरडतात ’हम्माऽ हम्माऽऽ’ तशी वाटतात, असं म्हणू पण जे काही चाललं आहे त्याला ’सेक्सी, उत्तान, मादक, भडक’ असं काही म्हणता येणार नाही.

रहमानची काळजी वाटते. आपल्या गाण्याचं इतकं भीषण रिमिक्स त्याने कसं सहन केलं असेल?

माझ्याप्रमाणे स्वत:च्या डोळे व कानांवर अत्याचार करून घेण्यास उत्सुक असणारांसाठी गाण्याची लिंक खाली दिली आहे.No comments:

Post a Comment