16 December 2016

अनुस्वार है बडे काम की चीज

ये जो अनुस्वार है ना, बडे काम की चीज है ।

पुस्तकी भाषेत लिहिलेलं ’करावे तसे भरावे’ हे वचन बोलीभाषेतून लिहीताना ’करावं तसं भरावं’ असं लिहावं. अनुस्वार न दिल्यास शेवटच्या अक्षराचा उच्चार दीर्घ गृहित धरला जात नाही. असं मी नाही व्याकरण म्हणतं.

सांगण्याचं कारण - बरेच जण पोस्ट लिहिताना असा अनुस्वार देणं टाळतात, त्यामुळे वाचताना भीषण गैरसमज होण्याची शक्यता असते. क्वचितप्रसंगी भाषेची शैलीदेखील बदलल्यासारखी भासते.

एखादे वेळेस टायपोमुळे त्रुटी राहातात पण त्या नेहमीच राहात नाहीत. तेव्हा लिहिताना काळजी घ्या. नाहीतर ठरावे शब्दाचं रुपांतर ’ठरावं’ असं न लिहिता ’ठराव’ असं लिहिलंत किंवा जावे ह्या शब्दाचं रुपांतर ’जावं’ असं न लिहिता ’जाव’ असं लिहिलंत तर संपूर्ण वाक्य विस्कळीत, असंबद्ध वाटू शकतं.

एक आपलं दोस्तीखात्यात सांगितलं.

अद्ययावत: हा नियम नपुंसकलिंगी शब्दांना लागू होतो. नाहीतर उद्या व्याकरण समजून ’ती येते आणिक जाते’ चं रूपातंर ’ती येतं आणिक जातं’ असं कराल आणि मला चुकीत काढाल.

No comments:

Post a Comment