10 February 2017

किडे

काही वर्षांपूर्वी उपवनला निळकंठ कॉम्पलेक्स इमारतीचे फोटो काढत होते. गेली अनेक वर्षे माझी फोटोग्राफी बाल्यावस्थेत हा भाग निराळा पण "विथ DSLR इव्हन मंकी थिंक्स..." सारखं मलाही एका खांद्यवर कॅमेऱ्याची बॅग आणि दुसऱ्या खांद्यावर ट्रायपॉड घेऊन चालताना लय भारी वाटत होतं.

मी ट्रायपॉड सेट केलाच असेल तेवढ्यात एक छावा, त्याच्या छावीचा हात धरून माझ्या दिशेने आला आणि मला म्हणाला, "एक्सक्यूज मी, व्हॉट डु यू थिंक, यू आर डुईंग?"

मी त्याला म्हणणार होते कि फोटो काढतेय... पण त्याने प्रश्न चुकीचा विचारला. मग मी म्हटलं, "त्याऽऽ बिल्डींगमधल्या एका माणसाला मारायची मला सुपारी मिळालीय. ह्या बॅगेत सिनेमात दाखवतात तशी फोल्डींगची स्नायपर गन आहे. बघायची का?"


तो छावीचा हात धरून त्याच्या मोटरसायकलवर बसून निघून गेला. तो बघायला तयार झाला असता तर त्याचे नि छावीचे फोटो काढून दिले असते. एक माझा पण काढून घेतला असता.

किडे करून फसलो ना?

जाऊ द्या. आता काय! राष्ट्रीय कृमीनाशक दिनाच्या शुभेच्छा!

तळटीप: हा फोटो चांगला नाही अ्सा एक्सपर्ट कडून आधीच शेरा मिळालेला आहे. कसा काढायला पायजे होता वगैरे कमेंटमध्ये सांगून आमच्या फोटोग्राफीचे आणखी वाभाडे काढू नयेत. पर्सनल मेसेजवर चालतंय.

No comments:

Post a Comment