बालक पालक


मागे एका कार्यक्रमाला गेले होते, तेव्हाचा अनुभव दिव्य होता.

पालक कुठेतरी खुर्च्यांवर बसून कार्यक्रमाचा आनंद घेत होते. त्यांच्या दोन लहान मुली यूट्यूबच्या व्हिडीओत मांजर कसं पायऱ्यांवरून घरंगळत जातं, त्याचं प्रात्याक्षिक करत होत्या. त्यांचा लहान भाऊ हातात सॉफ्ट टॉय धरून दुसऱ्या जिन्यावरून उलट्या पायऱ्या चढत होता. वर पोहोचला कि ते खेळणं खाली भिरकावून द्यायचं आणि स्वत:ही धडाधड जिने उतरत खाली जायचं. मग तीच कृती, त्याच क्रमाने पुन्हा पुन्हा करायची असं चाललं होतं.

मध्यंतरामध्ये ही पोरं बाहेर पळाली.

मग पित्याने मातेला विचारलं, "आपला मुलगा कुठे आहे?" त्यावर ती माता तितक्याच ईझमध्ये वदली, "कै म्हैत! असेल कुठेतरी."

खोटं ओळखता येईल का?


तीन चार वर्षांपूर्वी पाहिली होती ही मालिका - Lie to Me. चेहेऱ्यावरील सुक्ष्म हावभाव व देहबोली ओळखण्याची कला अवगत असलेला डॉक्टर कार्ल लाईटमन कशाप्रकारे खोट्यामागे दडलेलं खरं उजेडात आणतो, त्यावर ही मालिका बेतलेली होती. टिम रॉथचे बरेचसे संवाद ब्रिटीश उच्चारांमुळे subtitles शिवाय कळत नाहीत पण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी मालिका होती.

धर्मनिरपेक्षता अशी असते का?


हिंदूंच्या "धर्मनिरपेक्षतेचं" कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. हे मी हिंदू संस्कृतीबद्दल आस्था आहे म्हणून बोलत नाही. माझ्या दृष्टीने ज्या देशात धर्मापेक्षा देशहिताची काळजी जास्त वाहिली जाते, तोच खरा आदर्श देश असेल पण धर्मविविधता, संस्कृती संगम झालेल्या भारत देशामध्ये इतर धर्मांच्या तुलनेत हिंदू धर्मियांच्या भावना आपल्याच धर्माबद्दल बोथट झालेल्या आढळतात. कुणीही यावं, हिंदू धर्माला काहीही बोलावं आणि हिंदूंनी नंदी बैलासारख्या माना डोलावाव्यात असं झालं आहे.