Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

खोटं ओळखता येईल का?

0 comments

तीन चार वर्षांपूर्वी पाहिली होती ही मालिका - Lie to Me. चेहेऱ्यावरील सुक्ष्म हावभाव व देहबोली ओळखण्याची कला अवगत असलेला डॉक्टर कार्ल लाईटमन कशाप्रकारे खोट्यामागे दडलेलं खरं उजेडात आणतो, त्यावर ही मालिका बेतलेली होती. टिम रॉथचे बरेचसे संवाद ब्रिटीश उच्चारांमुळे subtitles शिवाय कळत नाहीत पण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी मालिका होती.

असत्यामागे दडलेलं सत्य शोधून काढणं हा प्रकार वरकरणी रोमांचक वाटतो पण दुसऱ्याच्या मनात काय सुरू आहे, हे क्षणोक्षणी ज्याला कळत असेल तो माणूस एकटा पडणार हे नक्की!

व्यक्ती समोर असेल तर हावभाव पाहून, फोनवर असेल तर आवाजाच्या पट्टीवरून, धारेवरून आणि श्वासावरून खरं-खोट ओळखता येतं.

फेसबुक स्टेटससारख्या क्षणैक मजकूरातून सत्य-असत्याची पारख करता येऊ लागणंसुद्धा शिकता यायला हवं. नाही का?

No comments:

Post a comment