29 May 2017

महाभारत विचारमंथन - १


बकासूर राक्षसाची कथा आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. लाक्षागृह प्रसंगानंतर पांडवांनी कुठेही जास्त दिवस न थांबता प्रवास केला. त्या प्रवासादरम्यान्च ते एकचक्रा नगरीमध्ये एका ब्राह्मणाच्या घरी राहत होते. तिथेच त्यांना बकासूर ह्या राक्षसाची माहिती मिळाली. मला ह्या गोष्टीमध्ये नेहमी एक बाब खटकत राहते.

पांडव राहात असलेली एकचक्रा नगरी कौरवांच्या किंवा कुठल्या ना कुठल्या तरी राज्याच्या अधिपत्या खाली असणारच. मग गाडाभर अन्न आणि सोबत एक जिवंत मनुष्यदेखील मटकावणाऱ्या बकासूराचा अंत करावा म्हणुन गावकऱ्यांनी त्या नगरीच्या राजाकडे आपलं गाऱ्हाणं कसं काय मांडलं नाही? त्या नगरीच्या लोकांचं आयुष्य बकासूरापासून वाचवण्यास राजा असमर्थ होता असा उल्लेख तर महाभारतात सापडत नाही. मग गावकऱ्यांनी बकासूराची बाब फक्त गावापुरतीच मर्यादीत ठेवण्यामागे कारण काय असावं?

No comments:

Post a Comment