मुंबईला गर्दी नवीन नाही. एकदा एक टॅक्सी ड्रायव्हर ट्रॅफिक जॅमला वैतागला होता. त्याला म्हटलं, ‘‘जर तुम्हाला ह्याची सवय नसेल तर तुम्ही मुंबईकर नाही आणि सवय करून घ्यायची नसेल तर मुंबई सोडा’’. मुंबईत राहायचं तर गर्दीची सवय करून घ्यावीच लागते.
मानलं तर आपली, मानलं तर परकी अशी ही गर्दी. असंख्य वाहनांची, त्यातून प्रवास करणाऱ्या असंख्य माणसांची आणि त्या माणसांच्या डोक्यात चाललेल्या असंख्य विचारांची. ही गर्दीच तर ओळख आहे मुंबईची, कधीही न झोपणाऱ्या शहराची. तुम्ही एकटे नाही हे सांगणारी आणि तुम्हीच एकटे नाही हेही सांगणारी.
जर गर्दीतून वाट काढत पुढे जाऊ शकलात तर मुंबईत तग धरून राहू शकाल आणि कदाचित मुंबईचं व्यसनही लागू शकेल. मुंबईची आठवण येते तेव्हा ह्या गर्दीची आठवण येणं अपरिहार्य आहे.

पहिला फोटो - भुलाबाई देसाई मार्गावरल्या सिग्नलवर काढला होता. बसेस येताना दिसताहेत तो आहे ताडदेव मार्ग आणि अगदी उजवीकडे हिरा पन्ना शॉपिंग सेंटरचा लहानसा भाग दिसतोय.
https://maps.app.goo.gl/GrEnegQgpseg2T6cA
भुलाभाई देसाई मार्गावरून मागे, म्हणजे दक्षिणेकडे गेलो तर हाच मार्ग पेडर रोड म्हणून ओळखला जातो. तिथेच लतादिदींचं घर असलेली इमारत आहे - प्रभुकुंज.

दुसरा फोटो Audi Showroom जवळ काढला होता.
https://maps.app.goo.gl/NvoRQKxsyBn1ePjZ9
दोन्ही फोटो निलांबरीतून काढले आहेत. कोविडच्या पहिल्या लॉक्डाऊनच्या एक महिना आधी काढलेले आहेत.