Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

मॉंटुकले दिवस

0 comments

ह्या पुस्तकाबद्दल लिहावं तेवढं कमीच आहे. बालमानसशास्त्र म्हटलं तर समजायला खूप सोपं, म्हटलं तर खूप कठीण. मुलांच्या निरागस विश्वात काय चाललेलं असतं, हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्याइतकंच लहान व्हावं लागतं; नव्हे, ते मूलच व्हावं लागतं.

मोठ्यांना सहजासहजी लक्षात न येणाऱ्या अनेक गोष्टींवर लेखक संदेश कुलकर्णी यांनी सहज, मिश्किल शैलीत अगदी थोडक्यात भाष्य केलं आहे. कुठेही इतरांना शिकवण्याचा, समजावण्याचा आव न आणता त्यांनी स्वत:च्या मनाचा हळुवार कोपरा उघडून दाखवला आहे आणि वाचकांनाही हळवं केलं आहे.

घरात जर लहान मूल असेल, तर त्याला हे पुस्तक वाचायला देण्याआधी मोठ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं.

तसं पहायला गेलं तर एक मॉंटू आपल्या सर्वांमध्ये असतो जो प्रत्येक गोष्टीकडे निरागसतेने पहातो. आपण मोठे झालो कि ह्या मॉंटूला विसरतो आणि निरनिराळ्या अपेक्षांची भिंग वापरू लागतो. साध्या गोष्टी एकदम मोठी संकटं वाटू लागतात. मनातल्या मॉंटूला कधी विसरू न देता आपलं बालपणही आपल्याला जपता आलं पाहिजे.

ह्या मॉंटुकल्या दिवसांमध्ये हरवून जाताना मलाही माझ्या मनातला मॉंटू सापडलाच.

Review posted on Goodreads.

No comments:

Post a comment