Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

दर्द का रिश्ता

0 comments
डेंटिस्टकडे जातानाचा प्रवास सुखमय नसतोच पण डेंटिस्टकडून घरी येतानाचा प्रवास कधी आल्हादक असतो का हो?

कधीमधी असतोय.

उदा. तुम्ही ज्या रस्त्यावरून चालत आहात तिथे तुम्हाला किंचीत गंभीर करणारी पाटी दिसली - ’स्व. कल्याणजी विरजी शाह चौक’, तर आजूबाजूला येणारे सर्व हॉर्न्सचे आवाज मूक होऊन जातात.पुढे गेल्यावर बाजूला दिसणारी इमारत ’प्रभुकुंज’ असेल तर तुमच्या डोळ्यांसमोरची रहदारी आपोआप नाहीशी होऊन जाते.


तुम्ही रांगत असल्यापासून जे आवाज तुमच्या कानात भरून उरलेले असतात ते तुमच्या मनाच्या ज्युक बॉक्समधून एखादं गाणं सुरू करून आपोआप तुम्हाला ताल धरायला लावतात. हेडफोनची गरजच उरत नाही.

डावीकडे हाजी अली समोर पसरलेला अथांग समुद्र, भन्नाट वारं आणि मोकळ्या रस्त्यावर सुसाट पळणाऱ्या गाडीत तुम्ही तुमच्याही नकळत एक गाणं गुणगुणू लागता. ड्रायव्हर मग मूड ओळखून रेडिओची खरखर बंद करतो.


आता तुम्ही म्हणाल, "डेंटिस्टसाठी इतक्या लांब"? तर असं आहे कि हे बंध नकळत जुळून आलेले असतात. एखादं गाणं लागलं कि कसा विशिष्ट प्रसंगच आठवतो किंवा एखाद्या प्रसंगी विशिष्ट गाणंच आठवतं, तसंच आहे हे. ये दर्द का रिश्ता है लोक्स! इसे कोई और नाम ना दो.

No comments:

Post a comment