Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

वाघाच्या एरियात

0 comments
आज Loksatta ची ही बातमी वाचली आणि आठवलं. 

ह्या ‘ली’ नावाच्या वाघीणीला आणि ‘साहेबराव’ नावाच्या वाघाला २०१८ मध्ये मी प्रत्यक्ष पाहिलं होतं. त्या वेळी ह्या दोघांनाही गोरेवाडा बचाव केंद्रात ठेवलं होतं. सकाळच्या कोवळ्या उन्हात दोघे मस्त पहुडले होते. साहेबराव बराच लांब होता पण ली मात्र अगदी हाताच्या अंतरावर. ली ला ‘शुक शुक’ केल्यावर तिने केवळ जागेवर उठून उभं राहण्याची लीला केली असती तरी माझे पाय लटपटले असते एवढे नक्की पण तरीही मी बिनधास्त उभी होते कारण मध्ये जाळीचं कुंपण होतं. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे कि ली तीनदा आई होऊनही तिला तिच्या बछड्यांचं मोठं होणं पहाता आलं नाही. मी पेंचला जाऊन आल्यानंतर काही दिवसांतच ली चे बछडे दगावल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली होती. खूप हळहळले कारण तेव्हांही ती गर्भवतीच होती. तीन-तीनदा वाघांचे बछडे दगावणं ही राष्ट्रीय संपत्तीचीही हानी आहे. आजच्या बातमीत ‘तिने बछड्याला उचललं त्याच वेळी त्याच्या डोक्याला मार लागला’ असं वाचलं. हे फारसं पटत नाही. 


पेंचच्या अभयारण्यात ‘एलिफंट ग्रास’ म्हणजे वाळलेलं पण उंच वाढलेल्या गवताचा एक भाग आहे. वाटाड्याने सांगितलं होतं कि तिथे वाघीण आपले बछडे इतर वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी लपवतात. त्या एलिफंट ग्रासचा एक लहानसा व्हिडिओ शूट केला होता. एक वाघीण त्या गवतात आपल्या बछड्यांसह अधून-मधून फिरते असं सांगितलं गेलं प्रत्यक्षात अशी वाघीण पहायला मिळाली नाही पण त्या उत्सुकतेने त्या गवतामधून जीपने प्रवास केला होता.


No comments:

Post a Comment