Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

व्यावसायिक नीतीमूल्ये १

0 comments
गोपनियता


आपला बिझनेस वाढावा म्हणून तुम्ही वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज वापराल. नवनवीन कल्पना राबवून आपल्या व्यवसायाची भरभराट व्हावी म्हणून तुम्ही रात्रंदिवस प्रयत्न कराल. हे करताना एक गोष्ट कटाक्षाने पाळा-


ज्यांच्यामुळे तुम्हाला बिझनेस मिळतो, ज्यांची कामे करुन दिल्यामुळे तुमच्या घरची चूल पेटते, त्या आपल्या ग्राहकांची/क्लायंट्सची कोणत्याही प्रकारची माहिती तुम्हाला कळली तर सोशल मिडीयावर त्याला थट्टेचा विषय बनवू नका.

तुम्ही स्वभावाने मिश्किल असाल किंवा मनुष्य स्वभावाचा वेगळाच नमुना म्हणून तुम्हाला तो किस्सा सांगावासा वाटत असेल पण आपल्या इन्कम सोर्सशी संबंधित व्यक्तींची केवळ सोशल मिडीयावरच नव्हे तर कुठेही थट्टा-मस्करी करणं हे व्यावसायिक नैतिकतेचं (प्रोफेशनल एथिक्स) उल्लंघन आहे. उलट तुमच्या क्लायंट्स/ग्राहकांची माहिती कळूनही तुम्ही किती गोपनियता राखता ह्यावर तुमच्या बिझनेसचं बरंचसं यश अवलंबून असतं.

No comments:

Post a Comment