Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

व्यावसायिक नीतीमूल्ये २

0 comments
टिका

आपले सम व्यावसायिक किंवा आपले सहकारी ह्यांच्या विरोधात बोलणे टाळा. 

काही वेळा क्लायंट्स/गिऱ्हाईक एकाकडून करुन घेतलेलं काम दुसऱ्याकडून पुन्हा करवून घेतात. दुसऱ्यांदा काम करुन देताना ‘आधीच्या माणसाने काम नीट करुन दिलं नाही’ असं सर्वसाधारणपणे सांगितलं जातं. सोबत आधीच्या माणसाबद्दल चार टिकेचे शब्द जोडले जातात.

अश्या टिकेमध्ये आपला सहभाग देणे टाळा. क्लायंट/गिऱ्हाईकाने दुसऱ्यांदा काम करुन घेण्यामागचं खरं कारण आपल्याला माहित असतंच असं नाही. आज दुसऱ्याचं काम जसं तुमच्याकडे आलं आहे, तसंच तुमचंही काम दुसऱ्याकडे जात असण्याची  शक्यता आहे. 


दुसऱ्यावर टिका केल्यामुळे आपल्या कामाचा परफॉर्मन्स वाढणार नसतो. त्याऐवजी पूर्वी करुन दिलेल्या कामात काही त्रुटी आढळल्याच तर त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया न देता, त्या दूर करुन काम जास्तीत जास्त निर्दोष करुन देण्याकडे कल ठेवा.

No comments:

Post a Comment