Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

भाषासूत्र

0 comments

मागल्या आठवड्यात ‘भाषासूत्र’ ने शंभरी पूर्ण केली. दैनिक ‘लोकसत्ता’ मध्ये २०२२ च्या जानेवारी महिन्यापासून सुरु झालेली ही लेखमालिका अद्यापही सुरु आहे. बहुधा एक वर्षभर ही मालिका चालावी.


सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस ह्या लेख मालिकेतून प्रसिद्ध होणारे व्याकरण, वाक्‌प्रचार, अपरिचित शब्द, शब्दांची व्युत्पत्ती, परभाषेतील शब्दांना मराठी समानार्थी शब्द अश्या मराठी भाषेशी संबंधित विविध विषयांवरील प्रा. यास्मिन शेख, भानू काळे, डॉ. निलिमा गुंडी यांच्यासारख्या तज्ज्ञ मंडळींचे लेख आपल्याला वाचता येतील. विशेषत: श्रीमती यास्मिन शेख आणि भानू काळे यांचे लेख आपल्या मराठी व्याकरण, उच्चारांच्या अनेक शंका, गैरसमजांना दूर करतात.



प्रमाण भाषा असो वा बोली भाषा, मराठीच काय पण कोणतीही भाषा बोलताना त्या भाषेचे व्याकरण समजून घेणे महत्त्वाचे का असते हे ह्या लेखमालिकेतील लेख वाचून सहज लक्षात येते. चुकीची व्याक्यरचना, त्यामुळे होणारा अर्थभेद टाळायचा असेल आणि त्याचसोबत आपल्या शब्दावलीमध्ये नवीन शब्दांची भर घालायची असेल तर ही लेखमालिका वाचणे उपयुक्त ठरेल.


‘मराठी बोला’ चळवळीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून लोकसत्ताच्या ह्या उपक्रमाकडे पहायला हरकत नाही. त्याचसोबत मो.रा. वाळींबे आणि यास्मिन शेख यांची मराठी शुद्धलेखन आणि व्याकरण ह्या विषयांवरील पुस्तके मराठी भाषेच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील. 

No comments:

Post a Comment