Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

आत्मस्तुती

0 comments

आज Satchidanand Shevde दादांनी पाठवलेला विचार इथे शेअर केल्याशिवाय राहवत नाही.

परैः प्रोक्ता गुणा यस्य निर्गुणोऽपि गुणी भवेत्‌|
इन्द्रोऽपि लघुतां याति स्वयं प्रख्यापितैर्गुणैः||

अर्थ: दुसऱ्यांनी ज्याचे गुण गायले असतील तो जरी गुणी नसला तरी गुणी [मानला] जातो. पण स्वतःच्या तोंडाने स्वतःचे गुणवर्णन केले तर इंद्राला सुद्धा कमीपणा येतो.

माझ्याही डोक्यात काल रात्रीपासून हेच विचार होते. काही उच्चपदाला पोहोचलेले लोकदेखील स्वतःच स्वतःची स्तुती करत असतात, तेव्हा असं वाटतं कि त्यांना अजूनही कशाचा तरी न्यूनगंड असावा. आपल्या उणिवा झाकण्यासाठीच मनुष्य स्वतःचं मोठेपण स्वतः सांगत असतो.

आपल्याकडे योग्यता असो वा नसो, आपण स्वत:ची स्तुती करण्यापासून स्वत:ला थांबवलं पाहिजे. आपलं नाणं खणखणीत असेल तर प्रसिद्धी मिळणार, स्तुती होणार हे नक्की आणि तसं नाही घडलं तर पुढे शिकण्यासाठी अजून वाव आहे, असं समजून आगेकूच करायची. आपलं अस्तित्व, आपल्या कर्तृत्वाचं मोठेपण इतरांच्या स्तुतीवर अवलंबून राहायला नको.

No comments:

Post a comment