Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

रील आणि शॉर्ट्सचा प्रेरणास्रोत - NasDaily?

0 comments

NasDaily चे एक मिनिट लांबीचे व्हिडिओज्‌ हे 'रील्स आणि शॉर्ट्स' व्हिडिओंमागील प्रेरणा आहे, असं मला वाटतं.


निरनिराळ्या विषयांवरची माहिती अतिशय रंजक व इंग्लिश कळणाऱ्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला कळावी अश्या पद्धतीने आणि मुख्य म्हणजे फक्त एका मिनिटात सांगायची हे काम नास डेलीने केलं.


ज्या काळात सोशल मिडीयावर व्हिडिओ पहाण्यासाठी चार-पाच मिनिटांचा संयम लोकांकडे असायचा त्या काळात ‘That’s one minute, see you tomorrow' अश्या घोषणेने नासचा व्हिडिओ एका मिनिटात संपायचा पण त्या एका मिनिटात त्या व्हिडिओंमधून एखाद्या देशाचं, संस्कृतीचं किंवा समुदायाचं अगदी जवळून दर्शन घडायचं.


NasDaily चा नवीन व्हिडिओ: https://www.youtube.com/shorts/t63MXT2juzw

हल्ली आपला संयम संपला आहे. जास्त लांबीच्या व्हिडिओतही टाईमलॅप्स असतो, प्लेबॅक स्पीड कमी-जास्त करता येतो आणि एका मिनिटाच्या व्हिडीओतही स्किप करण्याची सोय असावी असं वाटतं.


त्याच वेळेस Nas Daily चे व्हिडिओज पाहताना एक मिनिट कसा निघून जातो हे कळत नाही आणि त्याच्यासारखं एका मिनिटात पूर्ण व्हावं असं सहज-सुंदर सादरीकरणही कोणाला जमलेलं नाही.

No comments:

Post a Comment