21 April 2014

मानसिक गुलामगिरी

माझा संगणक गेले कित्येक महिने मी आजारी अवस्थेत चालवला. तेव्हा संगणक सुरू करण्यासाठी वीजप्रवाहाचं बटण दाबलं की सी.पी.यू. चं ’पॉवर’ बटण दाबण्याआधीच आतील पंखे काही क्षण फिरायचे आणि थांबायचे. ते पंखे फिरण्याचे थांबल्याशिवाय मला पॉवर बटण दाबून संगणक सुरू करताच येत नसे.


नंतर हा प्रकार इतका अंगवळणी पडून गेला की आता बावाजीने माझा सी.पी.यू. नवा चकाचक बनवून दिल्यावर देखील मी वीजप्रवाहाचं बटण दाबवल्यावर त्या "घुंईऽऽ" आवाजाची वाट पाहात कधी कधी थांबते. मग चूक लक्षात आली की स्वत:शीच हसते.

मानसिक गुलामगिरी सुद्धा अशीच ना! एकच अयोग्य गोष्ट वारंवार योग्य म्हणून करवून घेतली गेली की ते चूक सुद्धा बरोबर वाटायला लागतं.

2 comments:

  1. चुकीचे असण्याची इतकी सवय होते की चुकीचेच बरोबर वाटायला लागते आणि त्यात बदल म्हणजे चुकीची दुरुस्ती न वाटता त्रास वाटायला लागतो .

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरं आहे. आपल्या देशातील जनतेचंही असंच झालं आहे असं मला वाटतं.

      Delete