Kanchan Karai's personal blog.

© 2019 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

माझा समज आणि सत्य

0 comments
काल मला कुणीतरी सांगितलं कि "जरी तू (म्हणजे मी) सूर्य उगवतो आणि मावळतो असं म्हणत असलीस तरी:
१) पृथ्वी स्वत:भोवती फिरता, फिरता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते.
२) सूर्य हा स्वयंप्रकाशित तारा आहे.
३) चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून तो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो.
४) पृथ्वी आणि चंद्रांच्या प्रदक्षिणांच्या वेगामुळे पृथ्वीवरून चंद्राची केवळ एकच बाजू मानवाला दिसत असते.

५) चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही; तर तो सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो.
६) सूर्यग्रहण असतं तसंच चंद्रग्रहण सुद्धा असतं आणि पृथ्वीला ग्रहण लागत नसलं तरी सूर्य-चंद्र ग्रहणं पृथ्वीवरून पाहता येतात पण पाहताना चुकीच्या पद्धतीने पाहिल्यास आपल्या तब्येतीला भारी पडू शकतं."

आणि म्हणे, ही सर्व सप्रमाण सिद्ध झालेली सत्यं आहेत.

बाप्प्रे! काय, काय भयानक सांगतात ना लोक! " the earth revolves around me" ह्या माझ्या समजाचं काय होणार आता?


https://tinyurl.com/my-perception-and-the-truth

No comments:

Post a Comment