Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

आत्महत्या करणारा खरंच भेकड असतो का?

0 comments
आत्महत्या करणाऱ्याला भेकड म्हणणं, त्याच्या आयुष्याबद्दल मत देणं खूप सोपं असतं पण आत्महत्या करायला सुद्धा हिंमत लागते असं मला वाटतं.

इतना आसान नहीं होता, ज़िंदगी से रिश्ता तोडना । ख़ुदकुशी इन्सान तभी करता है जब उसका रिश्ता ज़िंदगी से जीते जी ख़त्म हो चुका हो ।

आत्महत्येचं समर्थन मुळीच करायचं नाही पण कोणाच्या आत्महत्येमध्ये आपला नकळत हातभार तर लागलेला नाही ना, हे पहाणंही महत्त्वाचं आहे.

काल एका मित्राचं Whatsapp स्टेटस आवडलं म्हणून जसंच्या तसं शेअर केलं होतं. सोशल मिडीयावर किती जण सायबर बुलिंगमुळे स्वत:ला मिटून घेत असतील?

कदाचित कोणाचा संघर्ष त्यांच्या घरीसुद्धा कोणी लक्षात घेत नसेल आणि बाहेरूनसुद्धा टिका सहन करावी लागत असेल. न मागता सल्ला देण्यासाठी तर सगळेच तयार असतात. केवळ जळफळाट म्हणून कंपूबाजीने एखाद्या व्यक्तीला सतत टोमणे मारले जात असतील. अमूक घाव वर्मी बसतो म्हणून वारंवार कुरापत काढली जात असेल.

...आणि मग अश्या हल्ल्यांपासून स्वत:ला न वाचवू शकलेल्या व्यक्तीला आपण नेभळट, भेकड म्हणून मोकळे होतो? त्यांनी स्वत:चं आयुष्य संपवलं कि आपल्याला दोष लागू नये म्हणून किती प्रयत्न करतो ना आपण? त्यांची अडचण समजून घेण्यासाठी एवढेच प्रयत्न केले असते तर?

दिखाई ना दे,
पर शामिल ज़रूर होता है,
खुदकुशी करने वाले का भी,
कोई ना कोई क़ातिल ज़रूर होता है ।

No comments:

Post a Comment