Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

तिची ओळख

0 comments
ती... आजवर तिला गृहिणी, हाऊसवाईफ ह्याच नावांनी ओळखलं गेलं. तिच्या कौशल्य मान्य करुनही ते तिची ओळख आहे ह्याची घरच्यांना दखलच घ्यावीशी वाटली नाही. तिनेही त्याचं वावगं मानलेलं नाही...

...आणि आज परदेशात एक अनोळखी माणूस तिच्याबद्दल दोन वाक्यांत जाणून घेऊन तिला तिची ओळख सांगतो.

"शशी, यू आर अ‍ॅन आन्त्रप्रन्युअर."

"तू एक उद्योजिका आहेस. एक व्यक्ती जी स्वत:चा व्यवसाय चालवते."

ती स्वत:शीच तो अपरिचित शब्द दोन-तीन वेळा उच्चारते. आन्त्रप्रन्युअर...! त्या अनोळखी व्यक्तीने सांगितलेला त्या शब्दाचा अर्थ, त्या अर्थाचा आपल्याशी असलेला संबंध ह्याचा तिला उलगडा होतो. तिच्या मनातला आनंद तिच्या चेहेऱ्याभर पसरतो. कॉलर टाईट केल्याप्रमाणे साडीचा पदर ती आणखी घट्ट ओढून घेते.

तिथून बाहेर पडताना तिला कुणाचं भान नसतं. तिच्या डोक्यात तो एकच शब्द पिंगा घालत असतो.

आन्त्रप्रन्युअर... आन्त्रप्रन्युअर!!

एका क्षणात परदेशातल्या उंचच उंच सिमेंट कॉंक्रिटच्या भिंती तिला ठेंगण्या भासू लागतात. नकळत ती मायकल जॅक्ससनसारखी एक गिरकी घेते. आजूबाजूचे लोक तिच्याकडे आश्चर्याने बघतात कि अचानक काय झालं हिला?

त्यांना कुठे माहित असतं... तिला आज तिची ओळख मिळालीय.

-इंग्लिश विंग्लिश ह्या हिंदी चित्रपटावर आधारित.

-कांचन कराई

No comments:

Post a Comment