Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

कबूतर भाग २

0 comments
कबुतराएवढा दुसरा नमुनेदार पक्षी आख्ख्या जगात नसेल. ह्याला उपजत दिशा ज्ञान असल्यामुळे पूर्वी ह्याचा पोस्टमनसारखा वापर केला जायचा आणि हल्ली खिडकीचं एक फळकूट बंद असेल तर बाजूच्या उघड्या जागेतून बाहेर पडावं एवढं साध कळत नाही त्याला. घरमाश्या, मधमाश्या बिनधास्त कुठूनही येतात, कुठूनही जातात. हे येडं बसतं तिथेच फडफड करत.


अंडी घालण्याची वेळ झाली कि मात्र घरमालकाला न जुमानता रोजच्या रोज काड्यांचा ढिग करतील. आपण तो कचरा उडवावा, ह्यांनी नव्याने तो करावा. हा खेळ अनेक दिवस चालतो.

आपल्याला असं वाटत राहातं कि हा पक्षी बिनडोकच असावा पण नाही, पाणी पिण्यासाठी भांडं भरुन ठेवलं तर मात्र साहेब भाव खात, लचकत, मुरडत येतात. ‘कोणी पाहिलं तर नाही ना मला’ सारखा आव आणत हळूच खिडकीतून डोकावून बघतात. मग अगदी सहजच लक्ष गेल्यासारखं "अगंबाई, पाणी वाटतं" ह्या थाटात त्या भांड्यात डोकावून बघतात आणि मग ‘आज द्यावाच ह्यांना सन्मान’ असं मनाशी ठरवल्याप्रमाणे टुप्‌कन त्या भांड्यावर चढून दोनदा चोच बुडवणार आणि भुर्रकन उडून जाणार.

कबूतर भाग १

No comments:

Post a Comment