Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

हल्ली स्त्रिया चेहऱ्याला काय लावतात?

0 comments
हल्ली स्त्रिया चेहऱ्याला काय लावतात? असं काय करतात चेहऱ्यावर की त्यांच्या गालाच्या हाडावरचा भाग टम्म फुगलेला असतो आणि डोळे मात्र त्या फुगीरपणात लपून बारीक आणि तारवटल्यासारखे दिसतात? 

वजन वाढलेलं आहे म्हणावं, तर बाकी शरीर प्रमाणबद्ध असतं पण चेहेऱ्यावरचा विशिष्ट भाग पार डोळ्यांच्या कडांपर्यंत प्रचंड सुजल्यासारखा दिसतो. सुरुवातीला ते पाहिलं की वाटायचं कॉस्मेटिक किंवा प्लास्टिक सर्जरी केलेली असावी पण जेव्हा सर्जरीसारख्या चोचल्यांच्या नादी न लागू शकणाऱ्या पोरी-बाळीसुद्धा ह्याच साच्यातून निघाल्यासारख्या दिसू लागल्या, तेव्हा काळजी वाटू लागली.
अनेक सेलिब्रिटी महिला, चित्रपट अभिनेत्रींचेसुद्धा चेहेरे असे दिसतात. हा परिणाम तात्पुरता असावा कारण प्रत्येक फोटोत तसा टमटमीत चेहेरा दिसत नाही पण काही फोटोंमध्ये तो बदल दुर्लक्षित करता येत नाही इतका ठळक असतो. 

 बाजारात एज कंट्रोलच्या नावाखाली असं कुठलं क्रीम आलंय का, की सलॉन्समधून अशी फेशियल ट्रीटमेंट पुरवली जाते, ज्यामुळे चेहेऱ्यात असे तात्पुरते बदल घडून येतात? शरीरावर ह्याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात?

No comments:

Post a Comment