Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

जगणे सोशल, मरणे सोशल

0 comments
जीना सोशल, मरना सोशल - हिंदी अनुवाद

Live social, Die social - In English

सोशल मिडीयावर, खासकरून Whatsapp वर अनेक जण संदेश अदलाबदलीचा खेळ खेळतात. म्हणजे आपण एक संदेश पाठवला कि तो न वाचता लगेच त्याच्या बदल्यात आपल्याला दुसरा मेसेज पाठवतात. आपण काय संदेश पाठवलाय, त्यात पोटतिडकिने काही महत्त्वाचं लिहिलेलं असू शकतं ह्याची दखलह न घेता स्वत:कडे असलेला मेसेज दुसऱ्याकडे घाईघाईने ढकलण्यात धन्यता मानणारा एक वर्ग तयार झालेला आहे.

चव्हाट्यावर होणाऱ्या कुचाळक्या त्या मानाने बऱ्या होत्या असं म्हणावंस वाटतं कारण निदान कुणाला काही दुखलं-खुपलं तर कुणी ना कुणी ताबडतोब मदतीला यायचं. असं परदु:खाबद्दल संवेदना, सहवेदना असण्याचं युग मागेच केव्हातरी संपलं. आताचं युग आहे ते सोशल असण्याचं म्हणजे आपण जिवंत, धडधाकट आहोत एवढी जाणीव करून देण्याचं आहे. त्यासाठी शुभदिवसाचे संदेश पुरेसे होतात. त्यापलिकडे, कदाचित तेही वाचायला वेळ नसतो इतके आपण स्वत:ला जिवंत ठेवण्यात व्यग्र झालो आहोत.

© कांचन कराई

No comments:

Post a comment